Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीTukaram Bidkar : उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का! माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे...

Tukaram Bidkar : उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का! माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन

अकोला : मूर्तिजापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार तथा वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड यांचे आज, गुरुवारी अपघाती निधन झाले. अकोलामधील शिवणी शिवर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्याआधी ते अकोला विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना भेटले होते. बावनकुळे यांना भेटून ते दुचाकीने घरी परतत होते. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

धडक देणारे मालवाहू वाहन हे गुरांची वाहतूक करीत असल्याने काही पोलिस त्या वाहनाचा पाठलाग करीत होते. तेव्हा या वाहन चालकाने आपले वाहन वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसांनी बिडकर सहपरिवार महाकुंभ मेळ्यात जाणार होते. मात्र, त्याआधीच त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली. अपघाताची वार्ता कळताच परिवाराने आक्रोश केला. तुकाराम बिरकड यांच्या पत्नी, भाऊ प्रकाश बिडकर, शत्रूघन बिरकड यांना अश्रू अनावर झाले होते.

Germany Car Accident : जर्मनीत कार चालकाने २० लोकांना चिरडले

तुकाराम बिरकड यांनी २००४ ते २००९ या काळात आमदारकी भुषवली होती. मुर्तीजापूर मतदारसंघाचे आमदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात होते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माळी समाजातील मोठा चेहरा होते. आमदार होण्याआधी ते अकोला जिल्हा परिषदेत सभापती होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शोकभावना:

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, माजी आमदार तुकाराम बिडकर हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेले, विदर्भाच्या विकासासाठी कार्यशील असलेले नेतृत्वं होते. तीन महिन्यापूर्वी झालेल्या अपघातातून ते नुकतेच सावरले होते. शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला सुध्दा ते उपस्थित होते. मात्र पुन्हा एकदा अपघातानेच त्यांचा बळी घेतला, ही घटना अत्यंत क्लेशकारक आहे. त्यांचं अकाली निधन हा राष्ट्रवादी परिवारासाठी मोठा धक्का आहे, अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -