Friday, March 28, 2025
Homeक्राईमKolhapur News : कोल्हापुरातून गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश!

Kolhapur News : कोल्हापुरातून गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश!

कोल्हापूर : गर्भलिंग निदान चाचणी म्हणजेच सोनोग्राफी व गर्भपात (Abortion) करणे कायद्याने गुन्हा आहे. तरी देखील अनेक दवाखान्यांमध्ये अवैधपणे गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्याचा प्रकार सुरु असतो. असाच प्रकार कोल्हापुरमध्ये घडला आहे. कोल्हापुरातील कळंबा परिसरात गर्भलिंग निदान चाचणी करुन गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. (Kolhapur News)

High Security Number Plate : हाय सिक्युरिटी नंबरप्लेटसाठी मुदतवाढ!

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कळंबा परिसरातील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान करण्यात असल्याचा प्रकार सुरु होता. दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकत रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

वरणगेत सुरु गर्भपातेचे प्रकरण

आरोग्य विभागाने पथकाला मिळालेल्या माहितीवरून वरणगे येथे देखील छापा टाकला. यावेळी महिला डॉक्टरसह याठिकाणी गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या सुप्रिया संतोष माने आणि धनश्री अरुण भोसले या दोघींनाही पथकाने पकडले. सुप्रिया माने आणि धनश्री भोसले यांना गोळ्यांची विक्री करताना तीन किटसह पकडण्यात आले. तसेच श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉ. दिपाली ताईगडे हिला देखील अटक केली असून तिघींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -