Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीHigh Security Number Plate : हाय सिक्युरिटी नंबरप्लेटसाठी मुदतवाढ!

High Security Number Plate : हाय सिक्युरिटी नंबरप्लेटसाठी मुदतवाढ!

पुणे : बनावट नंबर प्लेट लाऊन होणारे गुन्हे, रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे अशा विविध कारणांमुळे वाहनाच्या नंबर प्लेट वरून वाहनाची खरी ओळख पटविण्यासाठी मोठा अडथळा ठरतो आहे, यावर उकल म्हणून राज्य सरकारने सर्व वाहनांना “हाय सिक्युरिटी नंबर प्लेट” बसविणे अनिवार्य केलं आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (Regional Transport Department) याबाबत कडक धोरण अवलंबले असून ३० मार्च २०२५ पर्यंत ठाण्यातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (High Security Number Plate) लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये आता आणखी एक दिवसाची मुदतवाढ करुन देण्यात आली आहे.

जे. जे. उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण करणार

०१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या जीएसआर ११६२ (ई) नुसार नवीन वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या वाहनांसाठीची हायसिक्युरिटी (एचएसआरपी) नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ३१ मार्च असून त्याअगोदच ही नंबर प्लेट तत्काळ ऑनलाइन अर्ज करून बसवावी. २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनाला ही नंबर प्लेट नसेल तर अशा वाहनावर कारवाई केली जाईल, असे पुणे आरटीओकडून सांगण्यात आले आहे. (High Security Number Plate)

नागरिकांनी हायसिक्युरिटी नंबर प्लेट अधिकृत डीलरकडेच बसवावी. ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या घराजवळील डीलरकडून तुम्हाला तुमच्या वाहनाची नंबर प्लेट बसवण्यासाठी फोन येईल. सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन नंबर प्लेट बसवावी. त्याची वाहन संकेतस्थळावर नोंद होईल. मगच वाहनचालकांची वाहन संकेतस्थळावरील कामे करता येतील. अन्यथा त्यांची वाहन संकेतस्थळावरील वाहनासंदर्भातील कामकाज बंद केले जाणार आहे.

सर्व वाहनधारकांनी अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी. मदतीसाठी ७८३६८८८८२२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करु शकता. ३१ मार्चपर्यंत न बसवणाऱ्या वाहनांचे वाहन ४.० प्रणालीवर कोणतेही काम होणार नाही. दिलेल्या मुदतीत ही नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा, १९८८ व त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी म्हटले. (High Security Number Plate)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -