Thursday, July 10, 2025

काँग्रेसचा सज्जन कुमार १९८४ च्या शिख दंगली प्रकरणी दोषी

काँग्रेसचा सज्जन कुमार १९८४ च्या शिख दंगली प्रकरणी दोषी
नवी दिल्ली : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शिखविरोधी दंगल उसळली होती. या दंगलीला चिथावणी देऊन हत्या घडवून आणल्याप्रकरणी काँग्रेसच्या सज्जन कुमारला दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सज्जन कुमारच्या शिक्षेबाबत १८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यानंतर सज्जन कुमारला द्यायच्या शिक्षेबाबतचा निर्णय न्यायालयाकडून दिला जाईल.



ज्या प्रकरणात सज्जन कुमारला दोषी ठरवले आहे ते प्रकरण १ नोव्हेंबर १९८४ चे आहे. दिल्लीच्या सरस्वती विहारमध्ये वडील आणि मुलाची हत्या करण्यात आली होती. ही हत्या करणाऱ्या जमावाचे नेतृत्व सज्जन कुमारने केले होते. जमावाला सज्जन कुमारने चिथावणी दिली. यानंतर जमावाने बापलेकाला जीवंत जाळले होते. यानंतर घरात लुटालूट करण्यात आली. घरातील इतर सदस्यांना जखमी करण्यात आले.

जसवंत सिंह आणि तरुणदीप सिंह यांची हत्या करण्यात आली आणि घरातील इतर सदस्यांना जखमी करण्यात आले. या प्रकरणात सज्जन कुमार विरोधात १६ नोव्हेंबर २०२१ रोजी न्यायालयाने आरोप निश्चित केले. सुनावणीअंती न्यायालयाने १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सज्जन कुमारला दोषी ठरवले.
Comments
Add Comment