Thursday, March 27, 2025
Homeदेशमहाकुंभ : माघ पौर्णिमेला दीड कोटी भाविकांचे स्नान

महाकुंभ : माघ पौर्णिमेला दीड कोटी भाविकांचे स्नान

प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यात माध पौर्णिमेच्या निमित्ताने आज, बुधवारी सुमारे दीड कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमापासून १० किलोमीटर पर्यंत सर्वत्र भाविकांची गर्दी दिसून आली. याठिकाणी मंगळवारी संध्याकाळपासूनच माघी पौर्णिमेचे स्नान सुरू झाले होते. रात्री उशिरा मोठ्या संख्येने भाविक संगमावर पोहोचले. तर आज, बुधवारी सकाळी भाविकांची संख्या वाढली.

हे स्नान बुधवारी संध्याकाळपर्यंत सुरू होते. दिवसभरात सुमारे अडीच कोटी भाविक त्रिवेणी संगमात स्नान केले असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. माघ पौर्णिमा स्नानासाठी आलेल्या भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. वाढती गर्दी पाहता प्रयागराजमध्ये वाहनांना प्रवेश बंद असून महाकुंभमेळा क्षेत्र ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करण्यात आले होते.

Sunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्सची लवकरच होणार ‘घरवापसी’!

उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाकुंभातील हे पाचवे स्नान आहे. महाशिवरात्रीचे स्नान अजून बाकी आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी एक चूक झाली. त्यातून धडा घेऊन अधिक चांगले व्यवस्थापन कसे करायचे, यावर आम्ही काम करत आहोत.

तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून प्रयागराज रेल्वे स्थानकांवर भाविकांची गर्दी कायम आहे. दररोज 100 हून अधिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. शहरात मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत 108 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. यात उत्तर मध्य रेल्वेने 81 गाड्या, उत्तर रेल्वेकडून 10 आणि ईशान्य रेल्वेने 17 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. त्याचबरोबर, विशेष गाड्यादेखील सतत चालवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -