Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीSunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्सची लवकरच होणार ‘घरवापसी’!

Sunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्सची लवकरच होणार ‘घरवापसी’!

नासाने जाहीर केले नवीन वेळापत्रक

नवी दिल्ली : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) गेल्या वर्षी ५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात संशोधनासाठी गेली होत्या. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून एक किंवा दोन आठवड्यांत ते परततील, अशी अपेक्षा नासाने व्यक्त केली होती. मात्र, आठ महिने उलटले तरी अद्याप ‘स्टारलायनर’ पृथ्वीवर परतले नाही. त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता सुनीता विल्यम्सची लवकरच घरवापसी होणार असल्याची नासाकडून शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nitin Gadkari : ऊस तोडणी यंत्रासाठी राज्याने केंद्राला सुधारित प्रस्ताव सादर करावा – गडकरी

सुनीता विल्यम्स यांच्याबाबत परतीचा मुक्काम वाढतच चालला असून केवळ तारीख पे तारीख जाहीर करण्यात येत आहे. यामुळे स्पेसएक्स अंतराळवीर उड्डाणांसाठी कॅप्सूलची जागा घेईल, असे नासाकडून सांगण्यात आले आहे. बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या ऐवजी मार्चच्या मध्यात घरी परत आणता यावे म्हणून हा बदल करण्यात आला आहे.

नासाने काय म्हटले?

नासाने म्हटले आहे की, सुनीता विल्यम्स आणि बुच बिल्मोर यांना आणण्यासाठी १२ मार्च रोजी कॅप्सूल लाँच केले जाईल. स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूल बदलण्याचा पर्याय निवडल्यामुळे अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आता कॅप्सूल १२ मार्च रोजी ‘मिशनच्या तयारीच्या अधीन’ लाँच होईल. याचा अर्थ असा की, नवीन तारीख विल्यम्स आणि विल्मोरच्या नियोजित परतीच्या दिवसांच्या आधीची असण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांना सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्याचे मिशन लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -