IND vs END : किंग कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा महान विक्रम!

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड (IND vs END) यांच्यातील वनडे मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची (Team India) सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्माच्या रूपात पहिला धक्का बसला. दुसऱ्या षटकात १ धाव करून तो बाद झाला.



यानंतर, विराट कोहली (Virat Kohli) क्रीजवर आला आणि शुभमन गिलसह जबाबदारी स्वीकारली. या जोडीने १० षटकांत संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. ११ व्या षटकापर्यंत गिल आणि कोहलीमध्ये ५०धावांची भागीदारी झाली. यानंतर, दोघांनीही जलद धावा केल्या. भारताला १३ षटकांत ७९ धावांपर्यंत पोहोचवले. या काळात विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.


अहमदाबाद वनडेत १६ धावांचा टप्पा गाठताच, कोहलीने इंग्लंड संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या. इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यादरम्यान विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. याआधी, तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होता. मास्टर ब्लास्टरने इंग्लंडविरुद्ध ३९९० धावा केल्या आहेत. तसेच कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या संघाविरुद्ध ४०००धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ वेगवेगळ्या संघांविरुद्ध ४००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. इंग्लंडपूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च