डोंबिवलीत फिनशार्प सहकारी बँक नावाने एक सहकारी बँक सुरू झाली. नियमानुसार कोणत्याही सहकारी बँकेला नोंदणी करणे बंधनकारक आहे. पण रिझर्व्ह बँकेने २००२ पासून आतापर्यंत एकाही सहकारी बँकेची नोंदणी केलेली नाही. नोंदणी नसूनही फिनशार्प सहकारी बँकेने साडेबारा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून ठेवी गोळा करण्याची तयारी सुरू केली होती. कमीत कमी कागदपत्रे, किमान व्याजदरात कर्ज, पारदर्शक व्यवहार आणि पुढील दोन वर्षे ठेवींवर १२.५ टक्के व्याज अशी आकर्षक जाहिरात बँकेने सुरू केली होती. या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली. बँक सहकारी असल्याचे भासवले जात असले तरी तिची नोंदणी सहकार आयुक्तांकडे झालेली नसल्याचेही उघड झाले. बँकेचे संचालक म्हणून फक्त चार जणांची नावं सांगितली जातात. नियमानुसार संचालक मंडळाची स्थापना झालेली नाही आणि त्याची माहिती संबंधित सरकारी यंत्रणेला देण्यात आलेली नाही.
पीएनबी बँक घोटाळा आरोपी मेहुल चोक्सीला कॅन्सर
मुंबई : पंजाब अँड नॅशनल बँक अर्थात पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी याला कॅन्सर झाला असून तो बेल्जियममध्ये उपचार घेत आहे, अशी माहिती ...
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेच्या मिसिंग लिंकचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार
मुंबई : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक'चे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम ...






