Mobile Bathroom : मुंबईच्या रस्त्यांवर धावणार महिलांसाठी अनोखी बस!

  102

मुंबई : महिलांसाठी आनंदाची बातमी. आता झोपडपट्टीतील महिलांना रस्त्यावर आंघोळ करावी लागणार नाही. या समस्येचं निरसन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. महापालिकेने केलेल्या व्यवस्थेमुळे सुरक्षित, सुखकारक वातावरणात महिलांना आंघोळ करता येईल. यासाठी महापालिकेने फिरते स्नानगृह नावाची विशेष बस सेवा सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील कांदिवली परिसरात या बसचे उद्घाटन करण्यात आले आहे.



मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते कांदिवली येथे महिलांसाठीच्या मोफत मोबाईल बाथरूम हाय टेक बसचे उद्घाटन करण्यात आले आहे. या बाथरूममध्ये महिलांना मोफत आंघोळ करण्यात येणार आहे. तसेच यामुळे पाण्याची बचत देखील होणार असल्याचे म्हटले जात आहे. जिल्हा नियोजन समिती आणि महानगरपालिकेने ही संकल्पना राबवली असून याचा फायदा गोरगरीबांना, झोपडपट्टीमध्ये तसेच रस्त्यावर राहणाऱ्या महिलांनाही होणार आहे. बसचे व्यवस्थापन तीन बहिणी करत आहे. या तिघी बहिणी 'बी द चेंज' नावाची संस्था चालवत आहे. शहाराच्या इतर भागातही अशा हायटेक मोफत मोबाईल बाथरूम आणण्याची तयारी सुरू आहे.



बसमध्ये कोणत्या सोयी उपलब्ध आहेत ?


बसमध्ये पाच बाथरूम आहेत. हँडवॉश, शॅम्पु, टब, बॉडी वॉश, टॉवेल, गीझर तसेच मोबाईल चार्जिंगची देखील सुविधा उपलब्ध आहे. या बसमध्ये कपडे सुकवण्यासाठी ड्रायर देखील आहे. प्रत्येक व्यक्तीला ५ ते १० मिनिटे वेळ देण्यात येतील. बसमधील बाथरुमचे पाणी १० मिनिटानंतर आपोआप बंद होईल. बाथरुममधल्या टाकीची पाण्याची क्षमता २१०० लिटर इतकी आहे. बाथरुममध्ये बेसिन आणि इतर आवश्यक सुविधादेखील आहेत. महिलांकडून पालिकेच्या विशेष बससेवेचे स्वागत होत आहे.

Comments
Add Comment

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील