Saturday, October 18, 2025
Happy Diwali

Pune News : पुणे शहरात 'मिशन १७'अंतर्गत आणखी १७ रस्ते होणार सुपर फास्ट

Pune News : पुणे शहरात 'मिशन १७'अंतर्गत आणखी १७ रस्ते होणार सुपर फास्ट

पुणे : पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी महापालिकेने आता नव्याने १७ रस्त्यांची निवड करून 'मिशन १७' हाती घेतले आहे.त्यामुळे आता पुण्यात आणखी १७ रस्ते सुपर फास्ट होणार आहे. यासंबधीच्या कामाला पथ विभागाने प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.यासंदर्भात

पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली आहे.

महापालिकेने पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या १५ रस्त्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आता आणखी नव्याने १७ रस्त्यांची निवड करण्यात आली असून, या रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवून, चेंबर दुरुस्ती, अनावश्यक ठिकाणचे ग्रेड सेपरेटर काढून त्यांचे नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे.याबाबत पावसकर म्हणाले, 'मिशन १७'अंतर्गत निवड केलेल्या सर्व रस्त्यांचा आता सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. या रस्त्यांवरील कोणकोणत्या बाबींवर कामे करावी लागणार आहेत, त्याची यादी करण्यात येत असून, त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. त्यामुळे शहरातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारून वाहतुकीला गती मिळेल, असा विश्वास पावसकर यांनी व्यक्त केला.

'मिशन १७'अंतर्गत सासवड रस्ता, कात्रज-मंतरवाडी बायपास, जुना एअरपोर्ट रस्ता, आळंदी रस्ता, जुना पुणे-मुंबई हायवे, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, टिळक रस्ता, साधू वासवानी रस्ता, बंडगार्डन रस्ता, डॉ. आंबेडकर रस्ता, एम. जी. रस्ता, प्रिन्स ऑफ बेल्स रस्ता, कोंढवा मुख्य रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सेनापती बापट रस्ता यांचा समावेश आहे.

पुणे शहरातील ज्या रस्त्यांचा वापर सर्वात अधिक होतो, अशा रस्त्यांची पथ विभागाने पहिल्या टप्प्यात 'मिशन १५'अंतर्गत निवड केली होती. या रस्त्यांवरील वाहतुकीला वेग मिळावा, यासाठी आवश्यक सर्व सुधारणा या उपक्रमांतर्गत करण्यात येत आहेत. त्यात प्रामुख्याने अतिक्रमणे काढून रस्त्यांची डागडुजी, त्यावर डांबरीकरण करून रस्ते विकसित केले जातात. त्यानुसार १५ रस्त्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >