
मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे परिसरात सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आता वांद्रयातच ज्येष्ठ महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेचे हात बांधून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. मात्र सीसीटीव्ही फुटेज सापडल्याने पोलिसांनी तपास करत मारेकऱ्याच्या मुसक्या अवघ्या २ तासात आवळल्या आहे. असे असले तरी या हत्येच्या घटनेने वांद्रे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या ओशिवरा येथील लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठ्या ...
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे येथील रिक्लेमेशन परिसरातील इमारतीत राहणाऱ्या ६४ वर्षीय रेखा खोंडेंची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्याने रेखा खोंडेंचे हात बांधून त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. रेखा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठवला आहे.

मुंबई : गणेशोत्सव हा सर्वांच्या जवळचा विषय आहे. १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला सार्वजनिक गणपती उत्सव आजही कायम आहे. दरवर्षी भाविक मोठ्या ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी हा चोरीच्या उद्देशाने तीन दिवसांपूर्वी घरात घुसला होता. बंद खोलीतून कुजलेला वास येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले असता हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तब्ब्ल दोन तासात मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या. मारेकऱ्याच नाव शहरीफ अली समशेर शेख (वय २७ वर्षे ) असून तो मृत महिलेच्या शेजारीच राहत होता. या घटनेने वांद्रे परिसर हादरलं आहे.