वॉशिंग्टन: अमेरिकेतून आणखी एका विमान अपघाताची बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉट्सडेल एअरपोर्टवर एका खाजगी जेट विमानांची टक्कर झाल्याने अपघात झाला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर काहीजण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर रनवेला बंद करण्यात आला आहे. गेल्या १२ दिवसांमध्ये हा चौथा विमान अपघात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका मध्यम आकाराच्या बिझनेस जेटने उभ्या असलेल्या बिझनेस जेटला टक्कर दिली. हे जेट रनवेवर उतरले आणि पार्क केलेल्या गल्फस्ट्रीम २०० जेटला जाऊन धडकले. जेटचा प्रायमरी लँडिंग गिअर खराब झाल्याने ही दुर्घटना घडली होती.
US Plane Crash : अमेरिकेत पुन्हा विमान कोसळले! ६ जणांचा मृत्यू, अनेक घरांना आग
या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना ट्रॉमा सेंटरला नेण्यात आले. यातील एकाची प्रकृती स्थिर आहे. तर एका व्यक्तीचा यात मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह हाती घेतला जात आहे.
गेल्या काही दिवसांतील विमान अपघात
३ फेब्रुवारीला ह्यूस्टन येथून न्यूयॉर्कला जाणाऱ्या युनायटेड एअरलाईन्सच्या विमानाच्या इंजिनात आग लागल्याने उड्डाणापूर्वीच ते खाली करण्यात आले.
१ फेब्रुवारीला अमेरिकाच्या फिलाडेल्फियामध्ये रुसवेल्ट मॉलजवळ विमान दुर्घटना झाली होती.या घटनेत आतापर्यंत ६ मृत्यू झाला होता.
याआधी ३० जानेवारीला अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये रीगन नॅशनल एअरपोर्टजवळ हवेतच अमेरिकन एअरलाईन्सचे एक विमान आणि हेलिकॉप्टर यांच्यात भीषण टक्कर झाली. यानंतर विमान आणि हेलिकॉप्टर नदीत कोसळले. या अपघातात सर्व ६७ लोकांचा मृत्यू झाला.