मुंबई: कांदा केंसासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. कांदा केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. कांद्याचे तेल लावल्याने तुमच्या केसांची वाढही चांगली होईल. जाणून घ्या कांद्याचा रस लावण्याचे किती फायदे आहेत आणि घरी कसे तयार कराल.
कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. कांद्याचा रस तुम्ही कोंड्याची समस्या दूर करू शकता.
कांद्याचा रसामुळे केंसाना चमकही येते. यामुळे केस मऊ, हेल्दी आणि चमकदार होतात. कांद्याचा रस शाम्पूचा वापर करण्याआधी करा.
कांद्याचा रस गुणांची खाण आहे. यातील अँटीऑक्सिडंट गुण केसांना लवकर सफेद होण्यापासून वाचवतात.
सगळ्यात आधी कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ही पेस्ट गाळणीने अथवा सुती कपड्याने गाळून घ्या. त्यानंतर कांद्याचा रस नारळाच्या तेलात मिक्स करून १५ ते २० मिनिटे चांगले उकळा. थंड झाल्यावर याचा वापर करा. कांद्याचे तेल तुम्ही आठवड्यातून १ ते २ वेळा वापरू शकता. शाम्पू करण्याआधी १ ते २ तास लावा. त्यानंतर केस धुवा
जर तुमचा स्काल्प तेलकट असेल तर कांद्याच्या तेलाचा वापर कमी करा. या तेलामध्ये सल्फर असते ज्यामुळे स्काल्पला जळजळ आणि खाज येऊ शकते.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…