Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिक'ती'ची गोष्टOnion Oil : केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे कांद्याचे तेल, असे बनवा घरच्या...

Onion Oil : केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे कांद्याचे तेल, असे बनवा घरच्या घरी

मुंबई: कांदा केंसासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. कांदा केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. कांद्याचे तेल लावल्याने तुमच्या केसांची वाढही चांगली होईल. जाणून घ्या कांद्याचा रस लावण्याचे किती फायदे आहेत आणि घरी कसे तयार कराल.

कोंड्यापासून मुक्ती

कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. कांद्याचा रस तुम्ही कोंड्याची समस्या दूर करू शकता.

Skin Care : चेहऱ्यावर डाग किंवा सुरकुत्या आहेत? मग हे त्यासाठीच…

केसांना चमक येते

कांद्याचा रसामुळे केंसाना चमकही येते. यामुळे केस मऊ, हेल्दी आणि चमकदार होतात. कांद्याचा रस शाम्पूचा वापर करण्याआधी करा.

केसांचा रंग कायम टिकतो

कांद्याचा रस गुणांची खाण आहे. यातील अँटीऑक्सिडंट गुण केसांना लवकर सफेद होण्यापासून वाचवतात.

Health: दररोज एक वाटी दही खाल्ल्याने मिळतात हे जबरदस्त फायदे, डाएटमध्ये जरूर करा सामील

घरी असे बनवा कांद्याचे तेल

सगळ्यात आधी कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ही पेस्ट गाळणीने अथवा सुती कपड्याने गाळून घ्या. त्यानंतर कांद्याचा रस नारळाच्या तेलात मिक्स करून १५ ते २० मिनिटे चांगले उकळा. थंड झाल्यावर याचा वापर करा. कांद्याचे तेल तुम्ही आठवड्यातून १ ते २ वेळा वापरू शकता. शाम्पू करण्याआधी १ ते २ तास लावा. त्यानंतर केस धुवा

जर तुमचा स्काल्प तेलकट असेल तर कांद्याच्या तेलाचा वापर कमी करा. या तेलामध्ये सल्फर असते ज्यामुळे स्काल्पला जळजळ आणि खाज येऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -