पुणे : महाराष्ट्रावर जीबीएस अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) या आजाराचे संकट घोंगावत आहे. राज्यात जीपीएसचे आतापर्यंत १७३ रुग्ण आढळले आहेत. डॉक्टरांनी राज्यात आढळलेल्या सर्व जीबीएसबाधीत रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यात जीबीएसच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
Ganpati Visarjan 2025 : मुंबईतील गणपतींचे अखेर ११व्या दिवशी विसर्जन!
मिळालेल्या माहितीनुसार, काल पुण्यात जीबीएस (GBS) या आजाराच्या ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९२ वर पोहोचली आहे. त्यातच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आता मृत रुग्णांची संख्या ७ वर पोहोचली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १९२ रुग्णांपैकी ९१ रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. तसेच, ३९ रुग्ण पुणे मनपा, २९ रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा, २५ रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आणि ८ रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. सध्या ४८ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यातील जीबीएसचा वाढत्या फैलावामुळे आरोग्य विभागाकडून पुणे मनपा आणि जिल्ह्यातील वाधित भागांमध्ये सर्वेक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.