नमो कुस्ती महाकुंभ-२ देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महिला कुस्तीपटूंचा मोठा सन्मान

जामनेर : जळगावच्या जामनेर तालुक्यात १६ फेब्रुवारीला ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम' हा संदेश देत 'नमो कुस्ती महाकुंभ-२ मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महिला कुस्तीलाही समान सन्मान दिला जाणार आहे. मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' चा नारा देत ५० लाडक्या 'पैलवान' बहिणींच्या कुस्त्याही रंगणार आहेत. एवढेच नव्हे प्रारंभ आणि समारोप महिला कुस्तीने केला जाणार आहे. कुस्तीच्या इतिहासात महिला कुस्तीपटूंना असा सन्मान प्रथमच दिला जात असल्याची माहिती संयोजक समितीचे प्रमुख हिंदकेसरी रोहित पाटील यांनी दिली.



 



भारताच्या कुस्ती इतिहासात प्रथमच तब्बल ९ देशांचे नामवंत महिला आणि पुरुष मल्ल एकाच मंचावर भिडणार आहेत. भारत, फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशाचे ऑलिंपियन, जागतिक विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरी असे नामांकित पैलवान सहभागी होणार आहेत.

भव्य स्पर्धेत भारतातील नामांकित महिला कुस्तीपटू परदेशी मल्लांविरुद्ध आपली ताकद आजमावणार आहेत. ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री कोळी ही एस्टोनियाच्या युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूलाशी भिडणार आहे. तसेच विजय चौधरी (विश्व विजेता, ट्रिपल महाराष्ट्र केसरी) वि. सुक्सरोब जॉन (एशिया विजेता- उझबेकिस्तान), प्रतीक्षा बांगडी (पहिली महिला महाराष्ट्र केसरी) वि. अंजलीक गोन्झालेझ (वर्ल्ड चॅम्पियन-फ्रान्स), शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी) वि. गुलहिर्मो लिमा (वर्ल्ड चॅम्पियन), अमृता पुजारी (महिला महाराष्ट्र केसरी) वि. कॅटालिना क्सेन्टने (ऑलीम्पियन - रोमानिया), सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी) वि. घेओघे एरहाण (युरोप चॅम्पियन - मोल्दोवा), पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र केसरी) वि. जलाल म्हजोयूब ( आशियाई पदकविजेता - इराण), हर्षवर्धन सदगीर (महाराष्ट्र केसरी) वि. पै. इमामुक (वर्ल्ड चॅम्पियन - जॉर्जिया), सुमित मलिक (अर्जुन पुरस्कार, ऑलिंपियन) वि. पै.जस्सा (शेर ए पंजाब) , पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी) वि. पै. जॉन्टी गुज्जर (आंतरराष्ट्रीय विजेता - दिल्ली ), वेताळ शेळके (भवानी केसरी - महाराष्ट्र) वि. दिनेश गोलिया (आंतरराष्ट्रीय विजेता- हरियाणा), फ्लोरिन ट्रिपोन (युरोप चॅम्पियन - रोमानिया) वि. महेंद्र गायकवाड़ (उपमहाराष्ट्र केसरी), भूपिन्दर सिंह (भारत केसरी - पंजाब ) वि. युधिष्ठिर दिल्ली (राष्ट्रीय विजेता-हरियाणा), कमलजित धूमछडी (रुस्तुम ए हिंद - पंजाब) वि. विक्रांत कुमार (राष्ट्रीय विजेता - हरियाणा), सतेंदर मलिक (भारत केसरी - हरियाणा ) वि. योगेश पवार (उप महाराष्ट्र केसरी), बालाराफिक शेख (महाराष्ट्र केसरी) वि. सोनू (हिमाचल केसरी- हरियाणा), हरियाणा माउली जमदाडे (महान भारत केसरी) वि. मनजीत खत्री (भारत केसरी-हरियाणा), शिवा चव्हाण (राष्ट्रीय विजेता - महाराष्ट्र) वि. रजत मंडोथी (त्रिमूर्ती केसरी - हरियाणा), मुन्ना झुंजुर्के (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. हरिओमी ट्रॅक्टर (राष्ट्रीय विजेता- दिल्ली), बाळू बोडके (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. मनजीत मेला (राष्ट्रीय विजेता- हरियाणा), वेदांतिका पवार (उपमहाराष्ट्र केसरी) वि. शिवानी मेटकर (राष्ट्रीय विजेती), अपेक्षा पाटील (राष्ट्रीय विजेती ) वि. सोनाली मंडलिक (राष्ट्रीय विजेती) या २२ प्रमुख लढतीसोबत स्थानिक ३०० महिला आणि पुरुष पैलवानांच्याही जोरदार कुस्त्या पाहायला मिळणार आहे.

स्पर्धेत सहभागी खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिकांसह मानाची गदा आणि 'देवाभाऊ केसरी' हा प्रतिष्ठेचा किताब प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संयोजक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी दिली. ही स्पर्धा रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला जागत, या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचा साक्षीदार होण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
Comments
Add Comment

Arjun Tendulkar आयपीएल मधून OUT ! बीसीसीआयकडून मिळाली परवानगी, दुसऱ्या लीग मध्ये खेळणार,नेमकं चाललंय काय ?

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर त्याच्या खेळामुळे अनेकदा

vaibhav suryvanshi : वैभवची फटकेबाजी पाहून जोस बटलरही थक्क; म्हणाला – हा खेळाडू आहे की AI?

IPL 2026 मध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांची झोप उडवणारा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या

RR VS DC IPL : दिल्ली पुन्हा लय पकडणार ? मिचेल स्टार्कच्या पुनारागमनाकडे सर्वांचे लक्ष्य...

Ipl 2026 RR vs DC : दिल्लीने आयपीएल 2026 ची सुरूवात आशादायक पद्धतीने केली होती. मात्र लीगच्या मधल्या टप्प्यात दिल्लीची लय

क्रिकेट विश्वात खळबळ ! 2 खेळाडूंनी महिला डॉक्टरचे बनवले अश्लील VIDEO

2 players made an obscene VIDEO of a female doctor  :  क्रिकेट विश्वाला कलंक लावणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  श्रीलंकेचे क्रिकेटपटू

IPL 2026 MI vs SRH : वानखेडेवर मुंबईचा पुन्हा पराभव, हैदराबादचा दमदार ६ विकेट्सने विजय

मुंबई : आयपीएल २०२६ मधील ४१ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद ने मुंबई इंडियन्स ला ६ विकेट्सने पराभूत करत शानदार

IPL 2026 RR vs PBSK : राजस्थान रॉयल्स 6 विकेट्सने विजयी, पंजाबचा पहिलाच पराभव

चंदीगड : यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, त्यानंतर डोनोव्हान फरेरा आणि प्रभावी खेळाडू शुभम दुबे यांच्यातील शानदार