शिवरायांचा पुतळा उभारताना त्रुटी नको - मंत्री नितेश राणे

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीबाबत बैठक


मुंबई : राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.


मालवण येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतन पुतळ्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी मंत्री राणे बोलत होते.


पुतळा उभारणीच्या कामाची सविस्तर माहिती घेऊन मंत्री राणे म्हणाले की, या कामामध्ये त्रुटी नसाव्यात. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. राजकोट बंदर येथील हवामान आणि वाऱ्याचा वेग याचा पूर्ण अभ्यास करून पुतळा उभारणी करा. यासाठी कोणतीही घाई करण्यात येऊ नये, असे मंत्री राणे म्हणाले.



पुतळा उभारताना एकूण तीन आधार या पुतळ्याला देण्यात येत आहेत. पायापासून वरपर्यंत अखंड आधार असणार आहेत. सी ९०३०० ब्राँझ धातूचा वापर करण्यात येत आहे. हात आणि तलवार यांच्या मजबुतीसाठी केबल वापरण्यात येत असल्याची माहिती शिल्पकार अनिल राम सुतार यांनी दिली.


बैठकीस सार्वजनिक बांधकाम कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिव दीपाली घोरपडे, सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, आयआयटी पवईचे तज्ज्ञ आर एस जांगिड आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे

कल्याण-डोंबिवलीत ४०.०७ टक्के मतदान

मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत

ठाण्यात सुमारे ५५ टक्के मतदान

मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३०