

India vs England: दुसऱ्या वनडेत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत २-० ने विजयी आघाडी
रोहितचं शतक, गिलचं अर्धशतक कटक: तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज खेळला गेला. हा सामना भारताने इंग्लंडवर ४ गडी राखून जिंकला. भारताने ...
मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटप्रेमी वाईट कामगिरीसाठी रोहित शर्मावर टीका करत होते. अखेर रोहितने टीकाकारांना बॅटद्वारे प्रत्युत्तर दिले. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये १२, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३२ आणि टी २० मध्ये ५ अशी ४९ आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याची कामगिरी केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४३०२, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०९८७ आणि टी २० मध्ये ४२३१ अशा एकूण १९ हजार ५२० धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या आहेत.

India vs England: पहिल्या वनडेत भारताचा इंग्लंडवर सहज विजय
गिल, अय्यर आणि अक्षरची जबरदस्त अर्धशतकी खेळी नागपूर: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने सहज विजय मिळवला आहे. शुभमन गिल, श्रेयस ...
कटकच्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने ४९.५ षटकांत सर्वबाद ३०४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ४४.३ षटकांत ६ बाद ३०८ धावा करुन सामना जिंकला. भारताने इंग्लंड विरुद्धचा नागपूरमधील एकदिवसीय सामना चार गडी राखून आणि कटकमधील सामनाही चार गडी राखून जिंकला. लागोपाठ दोन विजय मिळवणारा भारतीय संघ आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमध्ये बुधवार १२ फेब्रुवारी रोजी विजयाची हॅटट्रिक करण्यास उत्सुक असेल तर इंग्लंड व्हाईट वॉश टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.