Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीनाशिक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे १३ फेब्रुवारीला नाशिकमध्ये 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे १३ फेब्रुवारीला नाशिकमध्ये 

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेना (शिंदे गटा)चे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आभार दौरा यात्रा येत्या १३ फेब्रुवारी रोजी नाशकात येत आहे.


या यात्रेच्या निमित्ताने शिंदे यांची नाशकात जाहीर सभा होत असून, महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जाहीर सभेत शिवसेनेतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.


या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख सुनील पाटील सह संपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे ,जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे हे प्रत्येक तालुक्याचा दौरा करून आढावा बैठक घेत आहे प्रत्येक तालुक्यातील तालुकाप्रमुख व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत तालुक्यातून किती शिवसैनिक येणार आहे याचा आढावा घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठक हॉलमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सोबत आढावा बैठक संपन्न झाली.

Comments
Add Comment