Friday, January 23, 2026

जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही?

जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही?

मुंबई: पाकिस्तानच्या यजमानपदाखाली या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरूवात होत आहे. स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. ही स्पर्धा ९ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

सर्व ८ देशांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. मात्र संघात बदल करण्याची शेवटची संधी अद्याप बाकी आहे. याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी आहे.

भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला स्थान मिळाले आहे. मात्र सध्या तो दुखापतीने त्रस्त आहे. त्याच्या पाठीचे स्कॅनही करण्यात आले आहे. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलेंन्समध्ये बुमराह रिहॅबसाठी आहे. येथे मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. टीम मॅनेजमेंटचीही त्याच्यावर नजर आहे.

यात असा दावा करण्यात आला आहे की बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही याचा निर्णय मंगळवारी ११ फेब्रुवारीला घेतला जाईल. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीदरम्यान बाहेर झाला होता. त्याला दुसऱ्या डावात खेळता आले नव्हते. यानंतर तो संघाबाहेर आहे.

Comments
Add Comment