Mexico : मेक्सिकोत ट्रक-बसच्या धडकेत बसला भीषण आग; ४१ जणांचा होरपळून मृत्यू

  71

मेक्सिको : दक्षिण मेक्सिकोमध्ये रस्ते ट्रकची बसला जोरात धडक लागून भीषण अपघात घडला. या धडकेत बसला आग लागली. या आगीत तब्बल ४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.ही दुर्घटना शनिवारी मेक्सिकोमधील दक्षिणेकडील राज्य असलेल्या तबास्को येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार ४८ प्रवाशांना घेऊन जाणारी बस एका ट्रकला धडकली. बस कॅनकुनहून तबास्कोला येत होती. या अपघातात बसमधील ३८ प्रवासी आणि दोन चालकांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. ट्रक चालकाचाही यामध्ये मृत्यू झाला. या अपघाताची काही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यात स्पष्ट दिसून येतंय कि टक्कर झाल्यानंतर बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि पूर्णपणे जळून खाक झाली.


 




आग विझवल्यानंतर, फक्त बसच्या चौकटीचे अवशेष शिल्लक राहिले. आतापर्यंत ३८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.तसेच या अपघातग्रस्त बसमधून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांपैकी १८ जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. मात्र मृतदेह ओळखण्यापलिकडे गेले आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त बसच्या संचालक कंपनीने अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. हा अपघात कसा झाला आणि अपघात झाला तेव्हा बस वेगमर्यादेमध्ये होती का? याचा तपास अधिकाऱ्यांसोबत मिळून करण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Comments
Add Comment

पंजाबमध्ये पुराचा हाहाकार, नवोदय विद्यालयात ४०० मुले अडकली; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालकांमध्ये संताप

गुरुदासपूर: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल व जम्मू-काश्मीरमधून

जर्मन वृत्तपत्राचा मोठा दावा: ट्रम्प यांचे ४ फोन, पण पंतप्रधान मोदींनी प्रतिसाद दिला नाही

नवी दिल्ली: अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या व्यापार तणावादरम्यान एक खळबळजनक दावा समोर आला आहे. जर्मन

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

पंतप्रधान मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव

उदयगिरी आणि हिमगिरी, २ निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस