कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूटमार होत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे तिकीट विक्री करणारा कर्मचारी प्रत्येक प्रवासीकडून जादा पैसे उकळत होता. कर्मचाऱ्याचे हे प्रकरण इतर प्रवाशांना कळताच त्यांनी कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नालासोपारा इथे राहणारा धिरज विश्वकर्मा यांना कुंभमेळ्यानिमित्त प्रयागराज येथे जायचं होतं. प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढायचे असल्याने ते कल्याण रेल्वे स्थानकात गेले. तिथे गेले असता त्यांनी पाहिले की तिकीट खिडकीवरील कर्मचारी प्रत्येक प्रवाशाकडून जादा पैसे उकळत आहे. हा रेल्वे कर्मचारी प्रत्येक प्रवासीकडून ३० रुपये अतिरिक्तचे घेत होता. त्यावर, प्रवाशाने ‘एका तिकिटामागे ३०-३० रुपये जास्त का घेत आहात? असा जाब विचारला असता, त्यावर कर्मचाऱ्याने आधी तिकीट काढलेल्या प्रवाशाला तिकीट दाखव, असे म्हणत त्याचे ३० रुपये परत करतो. पण, त्याने अशा प्रकारे याआधी अनेक प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ३० रुपये अधिकचे वसूल केले होते. यावर कर्मचारी त्या प्रवाशाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत बाजूला सरकण्यास सांगत चुकून झाल्याचे बोलत आहे.
दरम्यान, तिकीट विक्री कर्मचाऱ्याने प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांकडूनच केले की इतरही प्रवाशांकडून त्याने असे पैसे वसूल केले, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही केली जात आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…