Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीमुलुंडमध्ये दोन दिवसांचा मुंबई उपनगर ग्रंथोत्सव

मुलुंडमध्ये दोन दिवसांचा मुंबई उपनगर ग्रंथोत्सव

मुंबई : मुलुंडमध्ये दोन दिवसांचा मुंबई उपनगर ग्रंथोत्सव होणार आहे. हा सोहळा बुधवार १२ आणि गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ग्रंथालय इमारत मुलुंड पश्चिम येथे उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असतील तर प्रमुख उपस्थिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची असेल.

अभिनेत्री सोनम कपूर अहुजाचे कुटुंब वादाच्या भोवऱ्यात

उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर, समन्वय समिती व जिल्ह्यातील सर्व शासन मान्य ग्रंथालय यांनी संयुक्तपणे १२ आणि १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ग्रंथदिडी, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ विक्री तसेच चर्चासत्र आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ग्रंथदिंडीचा कार्यक्रम बुधवार १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत आहे.ग्रंथदिंडीचे उद्धघाटन आमदार मिहिर कोटेचा यांच्या हस्ते होणार आहे.

BMC Project : सांताक्रुझमध्ये मुंबई महानगरपालिकेचा पुष्पोत्सव

चर्चासत्र आणि मार्गदर्शन

बुधवार १२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात ‘मराठीतील पहिले ज्ञानपीठ’ या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळ, प्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळे, प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. अनंत देशमुख यांचे दुपारी १२.३० ते १.१५ या विषयावर मार्गदर्शन. तर दुपारी २ ते २.३० यावेळेत कुमारी सई विकास खंडाळे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र’ या विषयावर व्याख्यान, नंतर दुपारी २.३० ते ३.१५ या वेळेत ‘राज्य सेवा आयोग व लोक सेवा आयोग स्पर्धा परीक्षांविषयक मार्गदर्शन’ या विषयावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, उषा प्रविण गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाचे श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी ३.३० ते ४.३० ‘अभिजात मराठीतील शब्द वैभव’ या विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईत मागेल त्याला पाणी, १५ हजार जलजोडण्यांना दिली परवानगी

गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी ‘कथा कवितेच्या राज्यात’ या विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण. ‘भारतीय संविधान माझा अभिमान’ या विषयावर संविधानाचे लेखक आणि अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे ‘लोककला समजून घेताना’ या विषयावर श्रीमती डॉ. मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी २ ते २.४५ या वेळेत ‘आधुनिक शेती’ या विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुके, मालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर यांचे ‘कोवळ्या पालेभाज्या’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत ‘संत साहित्य गाण्यामधून’ या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे. तर कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -