Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीपालिकेने हाती घेतली ३३ हजार कोटींची विकासकामे

पालिकेने हाती घेतली ३३ हजार कोटींची विकासकामे

अनेक कामे प्रगतीपथावर सुरू

मुंबई : मुंबई महापालिका ही आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असतानाच महापालिकेकडून आर्थिक काटकसरीचे तथा नवीन कोणतीही प्रकल्प कामे हाती न घेण्याचे नियोजन करणे आवश्यक असतानाच महापालिकेने एकाच वर्षांत सुमारे ३३ हजार कोटींची कामे हाती घेतली. त्यामुळे आधीच अनेक कामे प्रगतीपथावर असताना त्यांना गती देण्याऐवजी प्रशासनाने केवळ नवीन कामे हाती घेत विकासकामांच्या खर्चाचा डोंगर वाढवल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेने चालू आर्थिक वर्षांत एकूण १ लाख ९९ लाख २३८.६३ कोटी रुपयांचे ४१ प्रकल्पांची कामे हाती घेतली. त्यामुळे या प्रकल्प कामांसाठी चालू आर्थिक वर्षांत २५,२३६.५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर आगामी सन २०२५-२६ या वर्षांत २ लाख ३२ हजार ४१२. ९८ कोटी रुपयांची तब्बल ५५ विकास कामे हाती घेतली. त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत १४ नवीन कामे हाती घेतली असून त्यासाठीचा खर्च हा सुमारे ३३ हजार कोटींनी वाढला गेला.

ही कामे घेतली हाती

१ . पूर्व मुक्त मार्ग अर्थात ऑरेंज गेट पासून ते ग्रँट रोड परिसरापर्यंत उड्डाणपूलाचे बांधकाम
प्रकल्प खर्च : २४८४.३४ कोटी रुपये, तरतूद : ९० कोटी रुपये
२. के पश्चिम व पी उत्तर विभागातील मालाड पश्चिम येथील एम.डी, पी रस्ता ते रायन इंटरनॅशनल स्कूल मालाड मार्वे रस्त्याला जोडणाऱ्या रामचंद्र नाल्यावरील वाहतूक पूल व उन्नत मार्ग
प्रकल्प खर्च : २१३९.५० कोटी रुपये, तरतूद १० कोटी रुपये
३. एम पूर्व विभागातील महाराष्ट नगर जवळ शीव पनवेल महामार्गावरील टी जंक्शन येथील उड्डाणपूलच्या आर्म १ आणि आर्म २ चे बांधकाम
प्रकल्प खर्च : ६६० कोटी रुपये, तरतूद १८.९४ कोटी रुपये
४. प्रमुख रस्ते व चौकांचे सिमेंट काँक्रिटीकरण
प्रकल्प खर्च : १७७३३.८९ कोटी रुपये, तरतूद : ३१११ कोटी रुपये
५. महापालिका हद्दीतील पूर्व व पश्चिम मार्गाचे नुतनीकरण(सर्विस रोड, स्लिप रोड व चौक)
प्रकल्प खर्च : २३३१.२२ कोटी रुपये, तरतूद : १७० कोटी रुपये
६. महापालिका हद्दीतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील प्रवेश नियंत्रण प्रकल्प
प्रकल्प खर्च : १३३४.२१ कोटी रुपये, तरतूद : ४४२,०० कोटी रुपये
७. जी दक्षिण विभागातील वरळी येथील साहित्य चाचणी प्रयोगशाळा व अस्फाल्ट प्लांट कार्यालयाचा पुनर्विकास
प्रकल्प खर्च : ७४५.१५ कोटी रुपये, तरतूद : ६५ कोटी रुपये
८. दहिसर चेकनाका येथे वाहतूक व व्यावसायिक केंद्र
प्रकल्प खर्च : २४७२.३९ कोटी रुपये, तरतूद : १५० कोटी रुपये
९. शीव रुग्णालय परिसराचा पुनर्विकास टप्पा २
प्रकल्प खर्च : २८१९.९९ कोटी रुपये, तरतूद : २४५ कोटी रुपये
१०. चांदिवली संघर्ष नगर रुग्णालयाचे बांधकाम
प्रकल्प खर्च : ६६८ कोटी रुपये, तरतूद : ५० कोटी रुपये
११. भांडुप मल्टीस्पेशालिटी रुग्णालय
प्रकल्प खर्च : ६०८.३७ कोटी रुपये, तरतूद : १८० कोटी रुपये
१२. वांद्रे येथे कर्करोगाकरता स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम
प्रकल्प खर्च : २०३ कोटी रुपये, तरतूद : २५ कोटी रुपये
१३. जी दक्षिण विभागातील नेहरु नगर विज्ञान केंद्राजवळ पूल तथा भुयारी मार्गाचे बांधकाम
प्रकल्प खर्च : २६७.३९ कोटी रुपये, तरतूद ५० कोटी रुपये

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -