Chhaava : 'छावा' चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला सुरुवात

मुंबई : अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'छावा' सिनेमा येत्या १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'छावा' (Chhaava) सिनेमा पाहण्यासाठी जगभरातील तमाम सिनेप्रेमी उत्सुक आहेत. त्यामुळे आजपासून चाहत्यांसाठी या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.



मॅडॉक फिल्मसची निर्मिती असलेला 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होत असून या सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात झाली आहे. बूक माय शो या तिकिट बुकींग साइटवर गेल्यास तुम्हाला कळेल की, अनेक ठिकाणी पहिल्या मॉर्निंग शोचं तिकिट ३०० ते ३५० च्या घरात विकलं जातंय. मॉर्निंग शोचं तिकिट अनेकदा स्वस्त असतं. परंतु 'छावा'च्या पहिल्या शोचं तिकिट २०० ते ४०० च्या रेंजमध्ये आहे. इतकंच नव्हे तर PVR, INOX सारख्या थिएटर्समध्ये काही ठिकाणी हेच तिकीट ४५०-५०० रुपयांपर्यंत बघायला मिळतंय.

'छावा'च्या मेकर्सने नुकतीच एक खास घोषणा केली त्यामुळे सर्वांना आनंद झाला. तो म्हणजे 'छावा' आता Imax मध्येही बघता येणार आहे. रुपेरी पडद्यावर 'छावा' Imax मध्ये बघता येणार असल्याने दर्दी प्रेक्षकांना सुखद धक्का मिळालाय. परंतु यासाठी प्रेक्षकांना मोठी रक्कम मोजावी लागेल. कारण 'छावा' सिनेमा Imax मध्ये बघण्यासाठी ५०० ते ८०० च्या घरात तिकिट उपलब्ध आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा अनुभवायला मिळणार आहे. (Chhaava)

Comments
Add Comment

KBC 17 : पाचवीतील इशित भट्टचा उद्धटपणा सोशल मीडियावर चर्चेत, अमिताभ बच्चनसोबत असभ्य वर्तनामुळे नेटकरी संतापले!

मुंबई : "अतिशहाणा त्याचा बैल रिकामा" या म्हणीचे उत्तम उदाहरण KBC शो मध्ये बघायला मिळाले. बॉलिवूडचे महानायक अमिताभ

आधी दशावतार आणि आता गोंधळची जोरदार चर्चा

मुंबई : नुकतेच 'दशावतार', 'कांतारा' यांसारखे मातीशी जोडलेले सिनेमे आपल्या भेटीला आले. त्यात आता गोंधळ या सिनेमाचीही

Diwali 2025 : न्यूयॉर्कमध्ये 'ऑल दॅट ग्लिटर्स' पार्टीत प्रियांकाची दिवाळी धम्माल !

न्यूयॉर्क : जगभरात ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस हिने न्यूयॉर्क शहरात दिवाळीपूर्वीच्या एका खास

ओंकार भोजने पुन्हा गाजवणार महाराष्ट्राची हास्यजत्रा

मुंबई : कोकणचा कोहिनुर असलेला हरहुन्नरी कलाकार म्हणजे 'ओंकार भोजने' पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत घर

Red Soil Storiesच्या शिरीष गवस यांच्या आजारपणाबद्दलचं सत्य आलेय समोर...पत्नीने सांगितले सर्व काही...

मुंबई: प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष गवस यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. त्यांना

सोहा अली खानची दिवाळी साफसफाई जिममध्येच! मजेशीर व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधले

मुंबई : दिवाळी जवळ येताच सगळीकडेच साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. यात सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. अभिनेत्री सोहा