मुंबई : अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ सिनेमा येत्या १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ‘छावा’ (Chhaava) सिनेमा पाहण्यासाठी जगभरातील तमाम सिनेप्रेमी उत्सुक आहेत. त्यामुळे आजपासून चाहत्यांसाठी या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.
अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू
मॅडॉक फिल्मसची निर्मिती असलेला ‘छावा’ सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होत असून या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात झाली आहे. बूक माय शो या तिकिट बुकींग साइटवर गेल्यास तुम्हाला कळेल की, अनेक ठिकाणी पहिल्या मॉर्निंग शोचं तिकिट ३०० ते ३५० च्या घरात विकलं जातंय. मॉर्निंग शोचं तिकिट अनेकदा स्वस्त असतं. परंतु ‘छावा’च्या पहिल्या शोचं तिकिट २०० ते ४०० च्या रेंजमध्ये आहे. इतकंच नव्हे तर PVR, INOX सारख्या थिएटर्समध्ये काही ठिकाणी हेच तिकीट ४५०-५०० रुपयांपर्यंत बघायला मिळतंय.
‘छावा’च्या मेकर्सने नुकतीच एक खास घोषणा केली त्यामुळे सर्वांना आनंद झाला. तो म्हणजे ‘छावा’ आता Imax मध्येही बघता येणार आहे. रुपेरी पडद्यावर ‘छावा’ Imax मध्ये बघता येणार असल्याने दर्दी प्रेक्षकांना सुखद धक्का मिळालाय. परंतु यासाठी प्रेक्षकांना मोठी रक्कम मोजावी लागेल. कारण ‘छावा’ सिनेमा Imax मध्ये बघण्यासाठी ५०० ते ८०० च्या घरात तिकिट उपलब्ध आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा अनुभवायला मिळणार आहे. (Chhaava)