पुणे : पुणे शहरात सातत्याने नवनवीन प्रकार घडल्याचे समोर येत असताना आता पुण्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. पुण्यात भुकूममध्ये पाकिस्तानी चलनातील नोट (Pakistani currency note) आढळली आहे. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Pune News)
Ration Card e-KYC : रेशन कार्डचं ई-केवायसी करण्यासाठी उरले ‘इतके’ दिवस!
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या हद्दीपासून अगदी काही मीटर अंतरावरील एका सोसायटीतील लिफ्टच्या बाहेर पाकिस्तानी चलनाची नोट आढळली. सोसायटीचे चेअरमन यांच्या निदर्शनास पाकिस्तानी चलनाची नोट पडलेली असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी तातडीने बावधन येथील पोलिसांना संपर्क करून चौकशीसाठी अर्ज दिला. पोलिसांच्या माहितीनुसार, ही नोट अनेकदा वापरात असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पुण्यात पाकिस्तानी चलनाची नोट कशी आली? ही नोट या सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर कोणाच्या खिशातून पडली? ती आपल्या देशामध्ये कोणाकडून आली? तिचा वापर कोण करत होते? पाकिस्तानमधून भारतामध्ये या नोटा कोण घेऊन आले? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या सगळ्या गोष्टींचा तपास बावधन पोलीस करत आहेत. (Pune News)