पुणे : देशभरात अपघात, आत्महत्या, मर्डर, बलात्कार अशा क्राईम घटना सातत्याने घडत असल्याचे दिसत आहे. सांस्कृतिक राजधानी मानले जाणारे पुणे शहर क्राईम घटनांमध्ये अव्वल स्थानी आहे. अशातच याच पुणे शहरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पुण्यातील दौंडमध्ये एका महिलेने घरात सतत होणाऱ्या वादाला कंटाळून पोटच्या लहान मुलांसह पती आणि सासऱ्यांवर कोयत्याने वार केला आहे. (Pune Crime)
Amitabh Bachchan : ‘निघायची वेळ झाली…’ अमिताभ बच्चन यांची पोस्ट पाहून फॅन्स चिंतेत!
आज पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमध्ये ही घटना घडली. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने थेट आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केली. तसेच महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केले. शंभू मिढे (१) आणि पियू मिढे (३) अशी मृत मुलांची नावे आहेत. तर पती दुर्योधन मिढे (३५) या घटनेत जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिसांनी या ३० वर्षीय आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. (Pune Crime)