मुंबई: लवकरच मुलांच्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरूवात होतेय. अधिकतर मंडळाने याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी मुलेही चांगलीच तयारी करत आहेत. परीक्षेच्या तयारीदरम्यान जर तुम्हालाही भीती वाटत असेल तर अजिबात घाबरू नका. थोडीशी प्लानिंग आणि काही सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची परीक्षेची भीती दूर घालवू शकता. तसेच तुम्हाला मार्क्सही चांगले मिळतील.
सगळ्यांनाच माहित आहे की सकाळच्या वेळेस अभ्यास करणे किती लाभदायक असता. कारण चांगल्या झोपेनंतर तुम्हाला एकदम ताजेतवाने आणि उर्जावान वाटते. सकाळच्या वेळेस शांतताही असते. यामुळे लवकर निजे लवकर उठे असा सल्ला दिला जातो. सकाळच्या वेळेस केलेला अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहतो.
चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर चांगले जेवण करणेही गरजेचे आहे. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असले पाहिजे. यामुळे एनर्जी मिळेल. जेवणात हिरव्या भाज्या, ताजी फळे, डेअरी उत्पादने, अंडी, मासे, मीटचा समावेश केला पाहिजे. सूप, ग्रीन टी आणि फ्रेश ज्यूस तुमच्या डाएट चार्टमध्ये असला पाहिजे. तसेच या काळात जंक फूडपासून दूर राहिले पाहिजे.
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर टाईम मॅनेजमेंट असणे गरजेचे आहे. तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर टाईम मॅनेजमेंटवर लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाला पुरेसा वेळ द्या. ज्या विषयात तुम्ही कमी आहात त्याला जास्त वेळ द्या. रिव्हीजनवर भर द्या.
विषय समजून घेऊन तो पाठ करा. नुसते पाठांतर करू नका. विषय खोलपणे जाणून घ्या. छोट्या छोट्या नोट्स बनवा. यामुळे रिव्हीजन करताना सोपे जाईल.