
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नव गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने हे गाणं लाँच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मुंबई : व्हॅलेंटाइन वीक ( Valentine Week ) शुक्रवार ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. प्रेमाची कबुली देण्यासाठी मुहुर्ताची आवश्यकता नाही. पण व्यावसायिक हेतूने ...
अमृता फडणवीस यांनी "मी पुन्हा येत आहे" म्हणत सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अमृता फडणवीस यांनी याआधीही काही गाणी गायली आहेत. त्यानंतर आता संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने त्यांच नवं गाणं लाँच होणार आहे. त्या म्हणाल्या 'जेव्हा कोणीही बंजारा समाज किंवा त्यांच्या संस्कृतीची चर्चा करतं तेव्हा मला खूप आनंद होतो.
View this post on Instagram
नुकतंच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा समाजाच्या सामाजिक योगदान आणि वारशाबाबत चर्चा केली. बंजारा समाज आणि त्यांच्या संस्कृतीचा आपण आदर केला पाहिजे. त्यांची संस्कृती आणि प्रथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त मी एक गाणं गायले आहे. ते जरूर ऐका आणि पाहा'
अमृता फडणवीस यांच्या या गाण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.