मुंबई : व्हॅलेंटाइन वीक ( Valentine Week ) शुक्रवार ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. प्रेमाची कबुली देण्यासाठी मुहुर्ताची आवश्यकता नाही. पण व्यावसायिक हेतूने अनेक ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाइन वीकमुळे अनेक प्रेमवीरांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे. यामुळे प्रेमाचा आठवडा प्रेमवीरांसाठी खास म्हणून ओळखला जातो.
प्रेमवीरांच्या आठवड्यातला दुसरा दिवस म्हणजेच प्रपोज डे. या दिवशी एकमेकांप्रती भावना व्यक्त केल्या जातात. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल तुम्ही कधीही भावना व्यक्त केली नसेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खास संधी असेल. तरुणाई हटक्या पद्धतीने प्रपोज करण्यासाठी निरनिराळे प्रयोग करते. बाजारात अनेक नवे ट्रेंड पाहायला मिळतात. जगाचे रूप बदलत आहे तसतसे वैविध्यपूर्ण कलाकुसरीला वेग आला आहे. प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवखेपण हे आढळतचं.
https://prahaar.in/2025/02/08/this-is-important-for-students-of-class-10th-and-12th/
प्रपोज करण्याचा नवा ट्रेंड तुम्हीही फॉलो करा
आज पर्यंत अनेकांनी बागेत, समुद्रकिनारी, पुस्तकांच्या माध्यमातून, गुडघ्यावर बसून, किंवा मित्र मैत्रिणींच्या मदतीने प्रपोज केलं असेलच. पण कधी हा विचार केलात का ? आपल्या चारही बाजुंनी पाणी असलेल्या अथांग पसरलेल्या महासागरात तुम्ही तुमच्या प्रेयसीला / प्रियकराला प्रपोज करू शकता ? होय आता तुम्हीही तुमच्या आवडत्या व्यक्तीला समुद्राच्या साक्षीने तुमच्या मनातल्या गोष्टी सांगू शकता तेही एकांतात.
तुम्ही ‘यॉट’ हे नाव कधी ऐकलंय का? मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ ओळखल्या जाणाऱ्या गेटवे वर ‘यॉट’ या छोटेखानी बोटी पाहायला मिळतात. या ‘यॉट’ बोटी तुमच्या प्रपोजच आकर्षण ठरू शकतात. ‘यॉट’ बोटी आधी बुक कराव्या लागतात. तुमच्या पसंतीनुसार बोटीवर सजावट केली जाते. जोडीदाराला एकांतात सरप्राईज देण्यासाठी ‘यॉट’ कल्पना भन्नाट आहे. आणि परवडणारी देखील आहे. याचं बुकिंग साडे तीन हजारांपासून सुरु होते. मग तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला कशापद्धतीने प्रपोज कराल ?