डहाणू : पालघर जिल्ह्यात डहाणूजवळ आशिया खंडातले सर्वात मोठे वाढवण बंदर उभारण्याचे काम सुरू आहे. या बंदराला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग उभारण्याचीही योजना तयार आहे. या महामार्गासाठी ३४८५.९९ कोटी रुपयांचा खर्च करण्याचे नियोजन आहे. एकूण ३२.२८ किमी लांबीचा महामार्ग उभारला जाईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) महामार्ग उभारणीची तयारी सुरू केली आहे. यासाठी भूसंपादन लवकरच सुरू होणार आहे.
महापालिका अर्थसंकल्पाचा आकडा सात वर्षांनी वाढला तब्बल ५० हजार कोटींनी
वाढवण बंदर उभे झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात तेथे दररोज ५० हजार मालवाहक वाहनांची ये – जा होईल, असा अंदाज आहे. यासाठी एनएचएआय चार येण्याच्या आणि चार जाण्याच्या अशा आठ मार्गिका असलेला अर्थात आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग उभारणार आहे.
गौतम अदानींनी मुलाचं लग्न साधेपणानं करुन केलं कोट्यवधींचं दान
हा महामार्ग वरोर येथून सुरू होऊन बावडा, सुमाडी, चिंचारे, नानीवली ते तवा असा असेल. यादरम्यान हा महामार्ग रेल्वेचा डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर, सध्याचा पश्चिम रेल्वेमार्ग, बांधकामाधीन बुलेट ट्रेन मार्ग, बांधकामाधीन बडोदा-मुंबई द्रुतगती मार्ग यांना पार करून राष्ट्रीय महामार्ग ४८ला तवा येथे जोडला जाईल. याला चिंचारे येथे बडोदा-मुंबई द्रुतगती मार्गासाठी तर सुमाडी येथे बुलेट ट्रेनच्या बोईसर स्थानकासाठी इंटरचेंज अर्थात आंतरबदल असेल.
प्रस्तावीत महामार्गावर दोन बोगदे असतील. त्यातील एक बोगदा सुमाडी ते रावतेदरम्यान वनक्षेत्रादरम्यान असेल. दोन मोठे पूल, १९ लहान पूल, तीन उड्डाणपूल, सात अंडरपास, २० हलक्या वाहनांचे व १० लहान वाहनांसाठीचे भुयारी मार्ग असतील.