Monday, March 24, 2025
HomeदेशAmit Shah : दिल्लीच्या जनतेने भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त केला

Amit Shah : दिल्लीच्या जनतेने भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त केला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आपवर टीका

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) आम आदमी पक्षाचा (AAP) मोठा पराभव झाला असून, भाजपाने (BJP) ५० जागांवर विजय मिळवत राजधानीत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. आम आदमी पक्षाने केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले, त्यामुळे तब्बल २७ वर्षांनंतर भाजपाने पुन्हा दिल्लीचा किल्ला सर केला. या विजयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

शाह यांचा ‘आप’वर हल्लाबोल

अमित शाह यांनी एक्सवर (Twitter) पोस्ट करत भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि दिल्लीच्या जनतेने भ्रष्टाचाराच्या विरोधात दिलेला कौल स्पष्ट असल्याचे म्हटले.

त्यांनी म्हटले आहे की, “दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेने खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ (Sheesh Mahal) उद्ध्वस्त करत आप-दा मुक्त दिल्ली केली आहे. ज्या लोकांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशा लोकांना दिल्लीकरांनी धडा शिकवला.”

दिल्ली आता विकासाच्या नव्या पर्वात – शाह

शाह पुढे म्हणाले, “दिल्लीमध्ये आता विकास आणि विश्वासाच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. दिल्लीत असत्याच्या सरकारचा शेवट झाला असून, अहंकार आणि अराजकतेचा पराभव झाला आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने विकासाचा व्हिजन दिल्लीत दाखवला आहे आणि त्यावर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला. या प्रचंड जनादेशाबद्दल दिल्लीच्या जनतेचे मनःपूर्वक आभार.”

मोदींच्या नेतृत्वातील भाजपाने आपली सर्व आश्वासने पूर्ण करून दिल्लीला देशातील एक नंबर राजधानी बनवण्याचा संकल्प केला आहे, असे शाह म्हणाले.

दिल्लीतील राजकीय समीकरणे बदलणार?

या निकालानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत भाजपा आणि आपमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -