
मुंबई : दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा (SSC HSC Exam) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. परीक्षा सुरु होताच यादरम्यान अनेक विद्यार्थ्यांकडून कॉपीचे प्रकरण समोर येते. प्रशासनाने कॉपीमुक्त राज्य करण्यासाठी अनेक नियम लागू करण्यात आले आहे. मात्र तरीही परीक्षेत कॉपी केल्याचे आढळून येत आहे. हे प्रकरण रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने आता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

सोलापूर : पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात भाविकांची नेहमीच मोठी रांग ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी कडक उपाययोजना राबविल्या आहेत. त्यानुसार, परीक्षांमध्ये कॉपी करताना किंवा विद्यार्थ्यांना मदत करताना आढळल्यास विद्यार्थ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. कॉपीमुक्त अभियान राबवत परीक्षेसाठी आवश्यक नियमावली विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे.
हॉल तिकीट विसरल्यासही परीक्षेला परवानगी
परीक्षेसाठी विद्यार्थी हॉल तिकीट विसरल्यास घाबरण्याचे कारण नाही असे परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे. हॉल तिकीट नसल्यानाही विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल, मात्र त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल. पुढील दिवशी मात्र हॉल तिकीट आणणे अनिवार्य आहे. तसेच, परीक्षेसाठी वेशभूषेवर कोणतेही बंधन नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. (SSC HSC Exam)