

जामनेरमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा
जामनेर : जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये १६ फेब्रुवारी २०२५ रोजी 'नमो कुस्ती महाकुंभ-२' सोबत 'देवाभाऊ केसरी' ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती ...
पंचांच्या निर्णयांमुळे संभ्रम निर्माण झाल्यामुळे शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात कुस्तीचा सामना घेण्याचा विचार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केला. या संदर्भात त्यांचे पृथ्वीराज मोहोळशी बोलणे झाले. पृथ्वीराज मोहोळने खेळण्याची तयारी दाखवली आहे. आता शिवराज राक्षेसोबत चर्चा करुन नंतर सामन्याचा दिवस आणि वेळ निश्चित करुन जाहीर केले जाईल; असे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले. शिवराजला वाटत आहे त्याच्यावर अन्याय झाला आणि पृथ्वीराजला वाटत असेल की पंचांच्या निर्णयामुळे आपण महाराष्ट्रे केसरी झालो का ? हा संभ्रम दूर करण्यासाठी कुस्ती खेळवण्याचा विचार केल्याचे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.

Maharashtra Kusti 2025 : शिवराज राक्षेच्या वादात चंद्रहार पाटीलची उडी; दोन्ही गदा परत करण्याचा घेतला निर्णय
सांगली : यावर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली. उपांत्य सामन्यामध्ये शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याचं बोललं जात आहे. या ...
कुस्तीपटू कधीही कुस्तीसाठी तयार असला पाहिजे. याच विचारातून सांगलीत सामना खेळवण्याबाबत पृथ्वीराज मोहोळ सोबत चर्चा केल्याचे चंद्रहार पाटील म्हणाले. लवकरच शिवराज राक्षे सोबतही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामना सांगली जिल्ह्यातील तरुण भारत या स्टेडियमध्ये होणार असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगितले. सांगली जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपर आहे. सांगलीत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आणि हिंदकेसरी मारुती माने आणि सहा ते सात महाराष्ट्र केसरी झाले आहेत. केसरीवरुन सुरू असलेला वाद सांगलीमध्ये मिटावा हा आमचा हेतू असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले.

महाराष्ट्र केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी, दोन कुस्तीपटूंवर कारवाई
नगर : महाराष्ट्र केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी झाली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. स्पर्धेअखेर पंचांनी दोन कुस्तीपटूंवर कारवाई केली. डबल ...
महाराष्ट्र केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी, दोन कुस्तीपटूंवर कारवाई
महाराष्ट्र केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी झाली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. स्पर्धेअखेर पंचांनी दोन कुस्तीपटूंवर कारवाई केली. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या व्यतिरिक्त पंचांच्या निर्णयाला डावलून मैदान सोडल्याने कुस्तीपटू महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.