Friday, February 7, 2025
Homeक्रीडाजामनेरमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा

जामनेरमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा

जामनेर : जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये १६ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘नमो कुस्ती महाकुंभ-२’ सोबत ‘देवाभाऊ केसरी’ ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत भारतीय महिला कुस्तीला प्रोत्साहन देणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या स्पर्धेमध्ये भारत, फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते, ऑलिंपियन, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरीसारखे महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. हे आयोजन मातीतील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या ऐतिहासिक कुस्ती स्पर्धेचे प्रमुख आयोजक महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, संपूर्ण महाराष्ट्रात या आयोजनाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि उत्साह आहे. या कुस्ती स्पर्धेमुळे जामनेर हे गाव जागतिक कुस्ती नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा करण्यात येणार आहे. हे क्रीडा संकुल सामान्य घरातील खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा पुरवण्यासाठी मोठी भूमिका बजावेल.

जामनेरमधील कुस्ती स्पर्धा रसिकांसाठी एक पर्वणीचा क्षण ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या कुस्तीपटूंना एकाच मंचावर पाहण्याची ही अनोखी संधी आहे. लाखो कुस्तीप्रेमींच्या नजरा आतापासूनच स्पर्धेकडे लागल्या आहेत. जामनेरमध्ये १६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सुरू होणारा नमो कुस्ती कुंभ रात्री ८ वाजेपर्यंत एकापेक्षा एक लढतीचा थरार सादर करणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -