
पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटलगत त्यांनी झाडाला गळफास घेतल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
अण्णा गुंजाळ असे पोलीस उपनिरीक्षकांचे नाव असून त्यांनी नेमकी आत्महत्या का केली, याबाबतचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
गुंजाळ हे खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते, मात्र तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. तसेच त्यांचा संपर्कही होत नव्हता.
दरम्यान, शुक्रवारी त्यांचा शोध लागला असता, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

ठाणे : बदलापूरमधील बलात्कार आणि अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण चर्चेत असतानाच आता आणखी एका शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराच्या (Molestation) घटनेने ...
अण्णा गुंजाळ यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर त्यांची गाडी सुद्धा आढळलेली आहे, या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचे कारण दडलेले असू शकते.
पोलिसांकडून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पाँईटवर असलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आता, या कारमधील डायरीत त्यांनी मृत्यूपूर्व काही लिहून ठेवले आहे का, याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.