अरे देवा! महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका, पण का?

  742

महापालिका शाळांत खरेदी करणार एमडीएफ डेस्क-चेअर्स; माजी शिक्षण समिती सदस्याने व्यक्त केली 'ही' भीती


मुंबई : महानगरपालिका (BMC) शाळांतील नर्सरी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक बैठक व्यवस्था (एमडीएफ डेस्क-चेअर्स) बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची भीती भाजपाचे माजी नगरसेवक आणि माजी शिक्षण समिती सदस्य पंकज यादव यांनी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्याकडे निवेदनाद्वारे वर्तवली आहे. त्यामुळे खरेदी करण्यात येणाऱ्या डेस्क खरेदी निर्णयाचा पुनर्विचार करून याबाबत तज्ज्ञ मंडळी द्वारे माहिती घेण्यात यावी आणि त्यांचा अभ्यास अहवाल आल्यानंतरच शिक्षण विभागाने खरेदीचा निर्णय घ्यावा, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.


मंगळवारी ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२५-२६ या आर्थिक वर्षांचा ३९५५.६४ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांना सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिशन अॅडमिशन मोहिमेची घोषणा करत आधुनिक, दर्जेदार, डीजिटल शिक्षणावर भर देणारा कौशल्य विकास, स्टेम रोबोटिक्स प्रयोगशाळा, ज्ञानपेटी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, विचारशील प्रयोगशाळा, आधुनिक पद्धतीचा अवलंब करत मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत लक्ष्य केंद्रीत करण्याचा प्रशासनाच्या प्रयत्नाबाबत पंकज यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले.



त्यांनीं आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शिक्षण विभागाची अर्थसंकल्प पुस्तिका काळजीपूर्वक वाचली असता असे लक्षात आले कि, महानगरपालिका शाळांतील नर्सरी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक बैठक व्यवस्था (एमडीएफ डेस्क-चेअर्स) करण्यात येणार आहे. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी २४,१७० डेस्क व ३९,१७८ चेअर्स खरेदीची निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे व यासाठी सुमारे १२ कोटीहून अधिक रक्कम खर्च करण्यात येणारा आहे असे नमूद केले आहे.


या बेंचेस लाकडाच्या बॅचेस पेक्षा स्वस्त असतात व त्या १० वर्षापर्यंत टिकतात ह्या गोष्टी मान्य आहेत. मात्र या बॅचेस मध्ये VOC (Volatile Organic compounds) नावाचा कंपाउंड असतो व या कंपाउंड मध्ये Urea formaldehyde नामक घटक असतो. या घटकामुळे आपल्या फुफ्फुस व डोळ्यांवर परिणाम होतो. शाळेतील मुले लहान असतात व त्यांची प्रतिकारशक्ती (Immunity) कमी असते. जेवढे तास विद्यार्थी त्या बेंचेसवर बसणार आहेत, तेवढा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. या कारणास्तव महापालिका शाळांमध्ये एमडीएफ डेस्क-चेअर्स बसविण्यात येऊ नयेत अशी मागणी त्यांनी महापालिका शिक्षण समितीचे माजी सदस्य या नात्याने केली आहे.

Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी