Friday, May 9, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

जम्मू-काश्मीर : नियंत्रण रेषेवरील चकमकीत ७ पाकिस्तानी घुसखोर ठार

जम्मू-काश्मीर : नियंत्रण रेषेवरील चकमकीत ७ पाकिस्तानी घुसखोर ठार
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे नियंत्रण रेषेवरुन काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात पाकिस्तानी घुसखोरांना भारतीय लष्कराने ठार केले. या घुसखोरांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीममधील जवान आणि अतिरेकी यांचा समावेश आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पूंछ मधील कृष्णा खोऱ्याजवळ घडली.पाकिस्तानी घुसखोरांची भारतीय सैन्याच्या आघाडीच्या चौकीवर हल्ला करण्याची योजना होती. भारतीय सैन्याला याची माहिती मिळाली आणि त्यांनी कारवाई करुन कट उधळून लावला. घुसखोरीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या सात जणांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमचे (बॅट) तीन ते चार सदस्यही ठार झाले आहेत. ही टीम सीमापार ऑपरेशन्समध्ये तरबेज असून या पाकिस्तानी एजन्सीने यापूर्वीही सीमेवर भारतीय सैनिकांवर हल्ला केला आहे.या कारवाईत मारले गेलेले अतिरेकी अल बद्र ग्रुपचे सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतचे सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडवू असे सांगितले होते. यानंतर हा घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे.
Comments
Add Comment