Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Breaking News : सावधान! मुंबईमध्ये GBS चा पहिला रुग्ण आढळला

Mumbai Breaking News : सावधान! मुंबईमध्ये GBS चा पहिला रुग्ण आढळला

मुंबई : मुंबईतून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या पुण्यात घोंगावत असलेल्या GBS आजाराने आता मुंबईतही शिरकाव केला आहे. मुंबईतील अंधेरी भागात एका पुरुषाला गुइलेन – बॅरे – सिंड्रोम झाल्याचे आढळले आहे. या रुग्णाला रुग्णालयात दाखल केले आहे. परंतु अद्याप बीएमसीकडून अधिकृतरित्या ही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

Actor Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद विरोधात अटक वॉरंट जारी!

मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात जीबीएस आजाराने शिरकाव केला आहे. एका व्यक्तीला या आजाराची लागण झाली असून त्याच्यावर महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीबीएस आजाराच्या उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाची स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसंच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी ५० विशेष बेड राखीव ठेवण्याची सूचना केली.

खासदार संजय दीना पाटील शिवसेनेच्या वाटेवर ?

शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. पुणे, सोलापूर सारख्या शहरांनंतर गुइलेन – बॅरे – सिंड्रोमच्या शिरकाव्यामुळे मुंबईकर भयभीत झाले आहेत. पुण्यात आज या आजाराने एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ६ वर पोहचली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -