रेफ्रिजरेटरसाठी देखभाल मार्गदर्शक : ताजेपणा आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स
जीबीएस या आजारावर मात करण्यासाठी पाणी पिण्याआधी अथवा खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्याआधी उकळून थंड करुन आणि गाळून घ्यावे. वैयक्तिक स्वच्छता राखावी, परिसर स्वच्छ राखावा. उघड्यावरचे खाणेपिणे टाळावे. शुद्ध पाणी प्यावे. ताजे सकस आणि वातावरणाला अनुकूल असे पदार्थ खावे. तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार करावे; असा सल्ला आरोग्य विभाग आणि डॉक्टर देत आहेत. पण आपण कितीही ताजे पदार्थ खाऊ असे म्हणालो तरी अनेकदा धावपळीच्या या दिवसांत तयार केलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेवायचे आणि नंतर खायचे असे अनेकजण करतात. यामुळे फ्रिजची अर्थात रेफ्रिजरेटरची स्वच्छता आणि देखभाल अतिशय महत्त्वाची आणि आवश्यक आहे.
Mumbai Breaking News : सावधान! मुंबईमध्ये GBS चा पहिला रुग्ण आढळला
रेफ्रिजरेटर हा गृहोपयोगी वस्तूंच्या जगातील पडद्यामागचा हीरो आहे. तुमचे अन्न ताजे आणि सुरक्षित राहील याची खात्री करून तो चोवीस तास शांतपणे काम करत असतो. म्हणूनच काही सोप्या टिप्स वापरून त्याची काळजी घेणे तसेच त्याची कार्यक्षमता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या रेफ्रिजरेटरच्या देखभालीकडे नियमितपणे लक्ष दिल्यास विजेचे बिल कमी होते, अन्नाची नासाडी कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या या मदतनीसाचे आयुष्य वाढते. गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपचा भाग असलेल्या गोदरेज आणि बॉयसेच्या अप्लायन्सेस बिझनेसमधील रेफ्रिजरेटर्सचे उत्पादन गट प्रमुख अनुप भार्गव यांनी तुमच्या रेफ्रिजरेटरची कार्यक्षमता टिकवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत :
GBS in Maharashtra : महाराष्ट्रात जीबीएसमुळे ६ मृत्यू, राज्यात जीबीएसचे १७३ रुग्ण
- रेफ्रिजरेटरची जागा : सूर्यप्रकाश किंवा उष्णतेच्या कोणत्याही स्त्रोताच्या थेट संपर्कात तुमचा रेफ्रिजरेटर येणार नाही, याची खात्री करा. फ्रीज आणि त्याच्या आसपास असलेल्या भिंती किंवा कॅबिनेटमध्ये किमान 50 मिमी अंतर ठेवा. असा सेटअप रेफ्रिजरेटर्सची कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासोबतच थंड होण्याचे प्रमाण वाढवतो.
- खाद्यपदार्थ व्यवस्थित ठेवा : उरलेल्या वस्तूंसाठी एखादा डबा वापरणे ही एक साधी पण उत्तम सवय आहे जी तुमच्या फ्रीजची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढवण्यासोबतच तुमचे अन्न ताजे देखील ठेवते. योग्यरित्या सीलबंद केलेले डबे जास्त आर्द्रतेला रोखतात आणि रेफ्रिजरेटरची आर्द्रता पातळी राखण्यास मदत करतात. रेफ्रिजरेटरमध्ये योग्य गोष्ट योग्य ठिकाणी ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे. यामुळे देखील अन्न ताजेतवाने राहते. दूध हे कधीही वरच्या कप्प्यात तर फळे आणि भाज्या या त्यांच्यासाठी असलेल्या ड्रॉवरमध्येच ठेवल्या पाहिजेत. तुमच्या रेफ्रिजरेटरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये योग्य तापमान देण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन केलेल्या एअरफ्लो तंत्रज्ञानासह गोदरेज रेफ्रिजरेटर्सची रचना केली आहे.
- योग्य तपमान राखा : रेफ्रिजरेटरच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी, योग्य तापमान राखणे गरजेचे आहे. उन्हाळा जास्त असेल तेव्हा किंवा जेव्हा फ्रीजमध्ये भरपूर सामान असेल तेव्हा सर्वाधिक गार तापमान ठेवायला हवे. याउलट, हिवाळ्यात किंवा फ्रीजमध्ये कमी सामान असताना, तापमान किमानवर सेट करता येऊ शकते.
- स्वच्छता महत्त्वाची : रेफ्रिजरेटरची देखभाल करण्यामध्ये त्याची नियमित स्वच्छता करणे, हे फार महत्त्वाचे आहे. सांडलेल्या खाद्यपदार्थांमुळे बुरशी येऊ शकते. याचा इतर वस्तूंवरही परिणाम होऊ शकते. बऱ्याच रेफ्रिजरेटर्समध्ये आता स्लाईड-आउट, काचेचे शेल्फ अत्यंत योग्यरित्या येतात, ज्यामुळे साफसफाईची प्रक्रिया सुलभ होते. बॅक्टेरियामुळे उत्पादन लवकर खराब होऊ शकते, त्यामुळे आपली वस्तू दीर्घकाळ टिकण्यासाठी अन्न ठेवताना फ्रिजची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. तुम्ही गोदरेजच्या पेटंटसाठी अर्ज केलेल्या अँटी-जर्म नॅनो शील्ड तंत्रज्ञानाची देखील मदत घेऊ शकता, जे 95% पेक्षा जास्त पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करते, ज्यामुळे तुमचे उत्पादन अधिक काळ स्वच्छ आणि ताजे राहण्यास मदत होते.
- फ्रिज भरून ठेवा, पण जास्त भरू नका : एक चांगला साठा केलेला रेफ्रिजरेटर रिकाम्या रेफ्रिजरेटरपेक्षा जास्त कार्यक्षमतेने काम करेल. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न आणि पेये तपमान टिकवून तसेच आणि स्थिर ठेवण्यास मदत करतील. पर्यायाने “कोल्ड रिझर्व्ह” म्हणून काम करतील, ज्यामुळे दार उघडल्यावर त्वरित उबदार हवा थंड करतात. असे असले तरी फ्रिझवर जास्त भार पडणार नाही, याची काळजी घ्या. कारण यामुळे हवेच्या वेंट्स ब्लॉक होऊ शकतात आणि हवेचा प्रवाह कमी होऊ शकतो, परिणामी, त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. रेफ्रिजरेटर देखील परिवर्तनीय मोडसह येतात. हे वैशिष्ट्य तुमच्या फ्रीजरचा वापर फ्रीजची अतिरिक्त जागा म्हणून करू देते, थोडक्यात, तुमच्या गरजेनुसार स्टोरेज आणि ऊर्जा कार्यक्षमतेचा योग्य वापर सुनिश्चित करते.
- गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे टाळा : गरम अन्न थेट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे ही चूक आहे. यामुळे त्याचे अंतर्गत तापमान वाढू शकते, ज्यामुळे कंप्रेसरला अधिक ताकदीने काम करावे लागेल आणि त्यामुळे अधिकची ऊर्जा खर्ची पडेल. म्हणूनच फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी तुमचे गरम अन्न नेहमी खोलीच्या तापमानासाठी थंड होऊ द्या.
- गॅस्केटची तपासणी करा : जीर्ण झालेले गॅस्केट थंड हवा बाहेर सोडू शकते, ज्यामुळे फ्रिजला जास्त मेहनतीने काम करावे लागेल. यासोबतच भेगा पडणे किंवा ठिसूळपणा यांसारख्या झीज होण्याची चिन्हे तपासा. या सोप्या देखभाल टिप्सचा तुमच्या रोजच्या जगण्यात समावेश करून, तुम्ही तुमच्या रेफ्रिजरेटरचे आयुष्य वाढवू शकता, वीजेची बचत करू शकता आणि तुमचे अन्नही जास्त काळ ताजे ठेवू शकता.
अरे देवा! महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका, पण का?