
पुणे : पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. हा अपघात आज (दि. ७, शुक्रवार) सकाळच्या सुमारास घडला असून आळेफाटा येथे खासगी बस कंटेनरला मागून धडकल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ४० ते ५० प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
/>
५० ते ६० प्रवाशांना घेऊन खासगी बस पुण्याहून नाशिकच्या दिशेनं निघाली होती. आळेफाटा येथे बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि बस समोरच्या कंटेनरला धडकली. या अपघातात ४० ते ५० प्रवासी जखमी झाले असून जीवित हानी झालेली नाही. पोलिसांनी या अपघाताची दखल घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे.