Mahakumbh Mela Fire : महाकुंभ मेळ्यात पुन्हा अग्नितांडव! अनेक तंबू जळून खाक

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये काही दिवसांपूर्वी आग लागल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. महाकुंभाच्या सेक्टर २२ आणि सेक्टर १९ मधील अनेक तंबूंना आग लागली होती. या घटनेला आठवडाही उलटला नसताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. (MahaKumbh Mela Fire)



महाकुंभ मेळ्यात सेक्टर १८ मधील शंकराचार्य मार्गावरील हरिहरानंद कॅम्पमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी ७ वाजताच्या सुमारास छावणीत दोन ठिकाणी ही घटना घडली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाल्याचे समोर आले नसले तरीही आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आग लागण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र महाकुंभमेळ्यात सातत्याने आगीच्या घटना घडत असल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (MahaKumbh Mela Fire)




Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था