महापालिकेच्या कामकाजात आता एआयचा वापर

विकास नियोजन खात्यात याची घेतली जाणार मदत


मुंबई(विशेष प्रतिनिधी) - आजच्या आधुनिक काळात महापालिकेच्या कामकाजातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेच्या कारभारात सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबईतील पायाभूत सुविधाबांबतचे निर्णय घेण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा अर्थांत आटीफिशर इंटेलिजन्स - एआय चा वापर केला जाणार आहे. महापालिकेच्या विकास नियोजन खात्यामार्फत या एआयचा वापर केला कामकाजात केला जाणार आहे.


मुंबई महापालिकेने भविष्यातील विकासाचा कल ओळखून संभाव्य शहरी मागणीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांबाबतची निर्णय प्रक्रिया सुधारण्याकरता विकास नियोजन खात्यामार्फत कृत्रिम बुध्दीमत्तेचा अर्थात एआय वापर करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या सन २०२५-२६ आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.


महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या माध्यमातून मुंबईतील विकास नियोजनाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये एकूण किती इमारतींना बांधकामाच्या परवानगी दिल्या आहेत, त्यातील ७० मीटर पेक्षा अधिक बांधकामाच्या इमारती किती आहे, उद्यान, मैदान, मनोरंजन मैदान आरक्षित किती भूखंड आहेत, त्यांचे क्षेत्रफळ किती आहे अशाप्रकारच्या विकास नियोजन विभागाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांची माहितीकरता ए आय वापर कामकाज पध्दतीत केला जाणार आहे. या एआयच्या वापर केल्यास एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच प्रारुप मतदार यादी केली प्रसिध्द

महापालिकेने केले स्पष्ट मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रारुप

स्वच्छ वायूसाठी युवकांची सक्रियता

महापालिकेच्यावतीने चेंबूर येथे कार्यक्रमाचे आयोजन, येत्या २८ नोव्हेंबर रोजी पार पडणार कार्यक्रम मुंबई (खास

Dharmendra He-Man : धर्मेंद्रच्या 'ही-मॅन' नावामागील रहस्य! पडद्यावरील 'विरू'ची खरी कहाणी जाणून घ्या

भारतीय सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते

"हि-मॅन’ची एक्झिट वेदनादायक" ॲड.आशिष शेलार

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, पद्मभूषण धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

'चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड' उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील

Dharmendra Last Movie : अखेरचा चित्रपट रिलीजच्या तोंडावर अन्... 'ही-मॅन' धर्मेंद्र यांनी घेतला जगाचा निरोप; धर्मेंद्र यांचा 'हा' चित्रपट ठरणार अखेरचा!

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते आणि 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे