मुंबई : महाराष्ट्रावर जीबीएस अर्थात गुइलेन – बॅरे – सिंड्रोम (Guillain–Barré syndrome or GBS) या आजाराचे संकट घोंगावत आहे. राज्यात आतापर्यंत जीबीएस अर्थात गुइलेन – बॅरे – सिंड्रोम या आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या सहा जणांपैकी पाच जणांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात झाला आहे. राज्यात जीबीएसचे आतापर्यंत १७३ रुग्ण आढळले आहेत. डॉक्टरांनी राज्यात आढळलेल्या सर्व जीबीएसबाधीत रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत.
जीबीएसचे रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासन सावध झाले आहे. प्रामुख्याने दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी पिण्याआधी अथवा खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्याआधी उकळून थंड करुन आणि गाळून घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य द्या. परिसर स्वच्छ राखा. उघड्यावरचे खाणेपिणे टाळा. शुद्ध पाणी प्या, ताजे सकस आणि वातावरणाला अनुकूल असे पदार्थ खा. तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार करा, परस्पर औषधोपचार करुन घेणे टाळा; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राज्यात आढळलेल्या १७३ जीबीएस रुग्णांपैकी ७२ बरे झाले आहेत, त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. सध्या ५५ जण आयसीयूमध्ये आणि २१ जण व्हेंटिलेटरवर आहेत. इतर जीबीएसबाधितांची स्थिती स्थिर आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…