कमर्शियल झोपड्यांना मालमत्ता कर लावण्याबाबत आयुक्त काय म्हणाले..

  325

मुंबई(विशेष प्रतिनिधी) - झोपडपट्टी भागातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना मालमत्ता कर लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. तसेच, करनिर्धारण व संकलन खात्याच्या वतीने अशा आस्थापनांवर कर आकारणी करण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणाची कार्यवाहीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. मात्र, अशाप्रकारची कर आकारणी करण्यात आली म्हणजे संबंधित अनधिकृत व्यावसायिक आस्थापना अधिकृत ठरत नाही, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.


मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ नुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जमिनी, इमारती (कच्च्या व पक्क्या) तसेच इतर सर्व मालमत्तांवर कर आकारणी करुन त्यांच्याकडून नियमितपणे करसंकलन केले जाते. परंतु,आतापर्यंत कर आकारणीच्या कक्षेत नसलेल्या झोपडपट्टी क्षेत्रातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना मालमत्ता कर लागू करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. याचे कारण, मुंबईमध्ये सुमारे अडीच लाख झोपडपट्टी आहेत. त्यापैकी, अनेक झोपड्यांचा (किमान २० टक्के म्हणजेच ५० हजार झोपड्या) लहान-मोठे उद्योगधंदे, दुकाने, गोदाम, हॉटेल्स अशा व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जात आहे. या आस्थापनांना मुंबई महानगरपालिकेमार्फत पायाभूत सुविधा पुरविल्या जात असल्याने या व्यावसायिक आस्थापनांचे करनिर्धारण करुन मालमत्ता कर संकलित करणे आवश्यक आहे.



तथापि, अशाप्रकारे झोपडपट्टी भागात व्यावसायिक आस्थापनांवर मालमत्ता कर आकारणी झाल्याने संबंधित अनधिकृत आस्थापना ही अधिकृत होतील, असा समज नागरिकांकडून होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच तत्सम आशयाच्या बातम्यादेखील प्रसारमाध्यमांतून व समाज माध्यमांतून प्रसारित होत आहेत. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून ठामपणे स्पष्ट करण्यात येते की, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम १५२ (अ) च्या तरतुदीनुसार, ‘कोणत्याही इमारतीचे किंवा इमारतीच्या भागाचे अवैधरित्या बांधकाम किंवा पुनर्बांधकाम झालेले असल्यास आणि त्यावर प्रशासनाकडून कर आकारणी किंवा दंड आकारणी करण्यात आली असेल, याचा अर्थ ते बांधकाम किंवा पुनर्बांधकाम विनियमित ठरत नाही.’ ही कायदेशीर तरतूद लक्षात घेता हे स्वयंस्पष्ट आहे की, झोपडपट्टी क्षेत्रातील व्यावसायिक आस्थापनांना करण्यात आलेली कर आकारणी म्हणजे संबंधित अनधिकृत व्यावसायिक आस्थापना अधिकृत ठरत नाही, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक