Valentine's Week: शुक्रवारपासून सुरू होतोय व्हॅलेंटाईन वीक...कधी कोणता डे पाहा संपूर्ण list

मुंबई: फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना साजरा केला जातो. प्रेमाचा हा महिना सुरू झाला आहे आणि शुक्रवारपासून म्हणजेच उद्यापासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतोय. सात दिवसांचा या आठवड्यात वेगवेगळे डेज साजरे केले जातात. त्यानंतर १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. जगभरात हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतात.

प्रेमाचे हे सेलीब्रेशन संपूर्ण आठवडाभर सुरू असते. तुम्हालाही तुमचे प्रेम व्यक्त करायचे आहे तर हा आठवडा बेस्ट आहे. तसंच तुम्हाला तुमचे प्रेम मिळाले असले म्हणून तुम्ही याचे सेलीब्रेशन करू नये असेही नाही बरं का...तुमचे प्रेम अधिक वाढवण्यासाठी तुम्ही हा वीक सेलिब्रेट करू शकता.

जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीकमधील डेज


७ फेब्रुवारी - रोझ डे

प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाब मानले जाते. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकमधील पहिला दिवस हा रोझ डे म्हणून साजरा करतात.

८ फेब्रुवारी - प्रपोज डे

व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस प्रपोज डे असतो. या दिवशी तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता.

९ फेब्रुवारी - चॉकलेट डे

तिसरा दिवस चॉकलेट देऊन साजरा केला जातो. तुमच्या आवडत्या व्यक्तीला या दिवशी तुम्ही चॉकलेट देऊन खुश करू शकता.

१० फेब्रुवारी - टेडी डे

सॉफ्ट टॉईज खासकरून टेडी बेअर महिलांना पसंत असतात. तुम्ही आवडत्या व्यक्तीला टेडी डे देऊ शकता.

११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे

कोणत्याही नात्याला मजबूत करण्यासाठी एकमेकांना वचन देणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा करतात.

१२ फेब्रुवारी - हग डे

प्रेम व्यक्त करण्याची प्रेमळ पद्धत म्हणजे त्या व्यक्तीला अलिंगन देणे म्हणजे हग देणे. म्हणून हा दिवस साजरा करतात.

१३ फेब्रुवारी - किस डे

व्हॅलेंटाईन वीकमधील ७वा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही जोडीादाराच्या कपाळावर अथवा हातावर किस करून आपल्या मनातील भावना सांगू शकता.

१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे

सात दिवस वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचता तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. १४ फेब्रुवारीला हा दिवस जोडपे एकमेकांसोबत साजरा करतात.
Comments
Add Comment

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी

रोज फिश ऑइल सप्लिमेंट्स घेताय? आधी हे वाचा !

मुंबई : सध्या निरोगी जीवनशैलीकडे झुकणाऱ्या अनेक लोकांचा कल हेल्दी डाएट, योगा, व्यायाम, आणि विविध सप्लिमेंट्सकडे

हे ६ पदार्थ देतात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम!

मुंबई : आपण बहुतांशवेळा कॅल्शियम म्हटले की दुधाचा विचार करतो. खरं तर, बऱ्याच लोकांना वाटतं की कॅल्शियम