पुणे : हिंदू गर्जना प्रतिष्ठान व पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदू गर्जना चषक महिला व पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२५ येत्या दि. ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी तब्बल ४५ लाखांची बक्षिसे असून खुल्या विजेत्याला महिंद्रा थार गाडी, चांदीची गदा आणि २ लाख ५१ हजारांचे बक्षिस दिले जाणार आहे. पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी या स्पर्धेविषयी माहिती दिली.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत खुला गट हा राज्यस्तरीय पुरुष आणि महिला असा असणार असून इतर गट पुणे शहर आणि जिल्हा अशा स्वरूपाचा असणार आहे. खुल्या गटातील पुरुष विजेत्याला महिंद्रा थार, चांदीची गदा आणि २ लाख ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…