नवी दिल्ली : भारत २०२७ मध्ये चंद्रावरील खडकांचे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी ‘चांद्रयान-४’ही मोहिम प्रक्षेपित करेल. अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी एका मुलाखतीत दिली. यासंदर्भात जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत २०२६ मध्ये खोल समुद्राचा शोध घेण्यासाठी ‘समुद्रयान’ मोहिम देखील प्रक्षेपित करेल आणि ‘गगनयान’ ही मोहीम देखील भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या तुकडीसह अवकाशात झेपावेल. चांद्रयान-४ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आहे. यामध्ये हेवी-लिफ्ट एलव्हीएम-३ रॉकेटचे किमान २ वेगवेगळे प्रक्षेपण समाविष्ट असतील जे मोहिमेचे ५ वेगवेगळे घटक वाहून नेतील जे कक्षेत एकत्र केले जातील. तसेच गगनयान मोहिमेत भारतीय अंतराळवीरांनी विशेषतः डिझाइन केलेल्या अंतराळयानातून पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे समाविष्ट आहे, पुढील वर्षी ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
भारत २०२६ मध्ये समुद्रयान देखील प्रक्षेपित करेल, ज्यामध्ये ३ शास्त्रज्ञांना खोल समुद्रात ६ हजार मीटर खोलीपर्यंतच्या पाणबुडीतून समुद्रतळाचा शोध घेण्यासाठी नेले जाईल. ही कामगिरी गगनयान अंतराळ मोहिमेसह भारताच्या इतर महत्त्वाच्या मोहिमांच्या वेळेनुसार होईल, जी देशाच्या वैज्ञानिक उत्कृष्टतेच्या प्रवासात एक सुखद योगायोग ठरेल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…