Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीमहालक्ष्मी येथील बोरीच्या मार्गावरील अतिक्रमणावर हातोडा

महालक्ष्मी येथील बोरीच्या मार्गावरील अतिक्रमणावर हातोडा

तब्बल १५० झोपड्या आणि बांधकामे हटवली

मुंबई(विशेष प्रतिनिधी)– महापालिका जी दक्षिण विभागातील महालक्ष्मी येथील जे. आर . बोरिचा रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत मुंबई महापालिकेने या मार्गावरील १५० झोपड्या तथा बांधकामांवर बुलडोझर चढवत कारवाई केली. अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आल्याचे येथील ३०० मीटर परिसराची पदपथ चालण्यास मोकळी झाली आहे. महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. मागील महिन्यात लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गावरील अनधिकृत शेडस्, दुकानांसमोरील वाढीव बांधकाम आदींवर मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी धडक कारवाई करत पदपथ, रस्‍ता मोकळा केल्यानंतर महालक्ष्मी येथील बोरीच्या मार्गांवरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चढवला.

घाटकोपरमधील झुनझुनवाला परिसरातील ४३ अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

सीताराम मिल म्युनिसिपल स्कूलकडे जाणाऱ्या या रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे येथील रहिवाशी, पादचारी, विद्यार्थी आणि पालक यांची प्रचंड गैरसोय व्हायची त्यामुळे या ठिकाणी असलेल्या अनाधिकृत बांधकामांच्या तक्रारींची दखल घेत जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. येथील सुमारे १५० झोपड्या तथा अतिक्रमणे बुधवारी हटवण्यात आली.

एन एम जोशी पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस समन्वयाने आणि सहकार्याने ही अतिक्रमणे हटवण्यात आली. या ६० पुरुष आणि ४० महिला पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तर महापलिकचे २० अभियंते आणि ५० बीएमसी कामगारांनी या कारवाईत भाग घेतला होता. जे आर बोरिचा रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या ३०० मीटर लांबीच्या पदपथावरील अतिक्रमण काढून टाकण्यात आल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -